प्रतिनिधी शेंदुर्णी –
शेंदुर्णी ची वाढती लोकसंख्या व वाढता परिसर लक्षात घेता खूप कमी जनित्र ट्रांसफार्मर होती ती वाढून मिळण्याची मागणी गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित होती त्या अनुषंगाने आठ जनित्र मंजूर झाले व सर्व फिटिंग पूर्ण करण्यात आली त्यामुळे वारंवार जनित्र डीपी जळण्याचे व दोन दोन तीन दिवस अंधार होण्याचे प्रमाण अगदी नगण्य राहणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले ,
काल शेंदुर्णी ते 33 /11 केवी उपकेंद्राला वीस फूट करणारी 33 केवी उच्च दाबाची वाहीनी शेंदुर्णी सोयगाव रस्त्यावर जमिनीला कमी अंतरावर होती त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता होती सदर वाहिनी वाहनांना लागण्याची पण शक्यता होती त्याकरिता सोयगाव रोडवर व दोन ठिकाणी व वनदेव मंदिराजवळ सदर मुख्य लाईन दोन उंच खांब लावून उंचीवर वाढवण्यात आली त्याचबरोबर झाडाच्या वाढलेल्या फांद्या तोडल्या गेल्या तसेच काही पोल वाढवण्यात आले व काही मजबूत करण्यात भर देण्यात आला सदर कामा साठी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल उपनगराध्यक्ष शरद बारी गट नेता नगरपंचायत योगेश बारी नगरसेवक संजय सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले .
यावेळी शेंदुर्णी कक्षाचे कक्ष अभियंता अजय ताजने,वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण राजपूत, राजेश राठोड , ज्ञानेश्वर निकम आदींनी कामकाजात लक्ष घालून काम केले. त्यांचे सोबत उपकार्यकारी अभियंता सचिन परदेशी होते.



