दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजना जलद गतीने पूर्णत्वास आणण्यासाठी शेंदुर्णी च्या नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Screenshot

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णीत सुरू असलेला पाणीपुरवठा सुरळीत राहावा, याकरिता वाघुर धरणाहून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येऊन त्याचे जवळपास काम पूर्णत्वास आले आहे. परंतु थोड्याशा अपूर्ण कामामुळे पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही. तो सुरळीत होण्याकरता व सुरू होण्याकरता ठेकेदारांना तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावे.अशी मागणी शेंदुर्णी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शेंदुर्णीला गलवाडा व गोंदेगाव धरणातून पाणीपुरवठा होतो.परंतु जुनी कालबाह्य पाणीपुरवठा योजना असल्याने आठ आठ दिवस नळाला पाणी येत नाही.नवीन पाणीपुरवठा योजना ही वाघुर धरणावून घेतली आहे.ती कार्यान्वित झाली तर एक दिवसाआड शेंदुर्णीकरांना पाणीपुरवठा होईल. यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेंदुर्णी येथील बोरवेल व विहीर आटण्याची पूर्ण शक्यता असल्याने नळाशिवाय पर्याय राहणार नाही. त्यासाठी अगोदरच जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित ठेकेदारांना काम पूर्ण करण्याचे तात्काळ आदेश द्यावे. त्यासोबतच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनातून मल निसारण योजना,सिमेंट काँक्रीन रस्ते,गटारींची कामे व इतर विकास कामे संथ गतीने सुरु आहेत. तिला वेग देण्यात यावा अशी मागणी गोविंद अग्रवाल यांनी केलेली आहे.
“दुष्काळी परिस्थिती असली तरी शेंदुर्णी करांना पिण्याचे पाणी कमी पडू दिले जाणार नाही,नागरिकांनी ही पाण्याची बचत करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला बैठक घेऊन तंबी द्यावी.काम दोन महिन्याच्या आत पूर्ण करावे.” गोविंद अग्रवाल नगराध्यक्ष शेंदुर्णी.