प्रतिनिधी: जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या गावांमध्ये गेल्या कित्येक वर्षानुवर्षे सीता मातेच्या बारा गळ्याची परंपरा सुरू आहे. श्रावण महिन्यातील शेवटच्या अमावस्याला सालाबाद प्रमाणे याही वर्षी बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी
दिनांक: ११/९/२०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास सीता मातेच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सासु सुनेची बारो पासून हनुमान मंदिरापर्यंत पार पडला. या कार्यक्रमासाठी भाजपा नगरसेविका बेबीताई पाटील व त्यांचे पती तुकाराम पाटील, भाजपा उपनगराध्यक्ष शरद बारी,कडुबा माळी, शंकर पाटील, भागवत सपकाळे, आकाश निकम, उत्तम घोडेस्वार, गौतम घोडेस्वार, बालाजी टेलर, राहुल बारी, भिका इंदलकर,विजय सपकाळे, गौतम नगर येथील सर्व कार्यकर्ते,गावातील ग्रामस्थ, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सहभागी होऊन मोठ्या आनंदाने हा उत्सव पार पाडतात. कार्यक्रमामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक भरत दाते, उपनिरीक्ष नंदकुमार शिंब्रे, उपनिरीक्षक गणेश सुस्ते पोलीस कर्मचारी योगेश सुतार, विलास चव्हाण, प्रशांत बडगुजर सर्व पोलीस कर्मचारी यांच्याकडून बंदोबस्त करण्यात आला.



