प्रतिनिधी शेंदुर्णी ता जामनेर – शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड प्राथमिक विद्या मंदिर शाळेत गोपालकाला निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरून मनमुराद आनंद लुटला. तसेच शिक्षक, पालक, गाडीचालक यांसह सर्वजण विद्यार्थ्यांच्या या आनंदात सहभागी झाले. यानंतर 4 थी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे तयार करून दहीहंडीला सलामी दिली.ही मानाची दहीहंडी इयत्ता 4 थी ई च्या विद्यार्थ्यांनी फोडली.या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. टी. माळी सर, वर्गशिक्षक श्री के. के. तडवी सर तसेच सर्व सहकार्यानी अभिनंदन केले. यावेळी संपूर्ण शालेय परिसर आनंद, उत्साह, भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



