शेंदुर्णी परिसरात नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ, ॲड.प्रसन्न फासे यांनी सलग ७ व्या वर्षी गुडघ्यावर वणीचा गड केला सर

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
शेंदुर्णी व परिसरात आज पासुन पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असुन साडेतीन शक्तिपीठांपैकी अनेक ठिकाणी जाऊन विविध नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पायी ज्योत आणली असुन गावात उत्साहात स्वागत करण्यात आले विविध मंडळांच्या देवींची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली असुन सलग ७ वर्ष झाले येथील ॲड.प्रसन्न फासे यांनी वणीचा सप्तश्रृंगी देवीचा गड गुडघ्यावर सर केला आहे.५०७ पायऱ्या गडाला आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असुन कपाशी वेचणी सुरू झाली आहे मात्र हवं तेवढं उत्पन्न घरी न आल्याने तसेच पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची चिंता वाढली आहे.
शहरातील बाजारपेठेत हार, फुलं,मिठाई , सजावटीसाठी लागणारे साहित्य वस्तु घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती.नवरात्रोत्सवात प्राचीन मम्मा देवीचे मंदिर सजले आहेत.