नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का ? शरद पवार

मुंबई – काँग्रेसच्या लोकांनी शिखांवर हल्ला केला असं एक मंत्री पंजाबमधे जाऊन बोलले. त्यानी लक्षात घ्यावं इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिलं आहे. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केलं. पाकिस्तानला धडा शिकवला, त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांची कुणासोबत तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरून केलेल्या वक्तव्याने वाद वाढला आहे.

जगात देशाची प्रतिमा वाढवण्यामधे इंदिरा गांधी यांचा हात – असे शरद पवार साहेब म्हणाले 

 देशाच्या प्रतिमेशी कधीही तडजोड केली नाही. त्या मास्कोला गेल्या होत्या. त्या मॉस्को विमानतळावर उतरल्या त्यावेळी त्यांच्या स्वागताला काही काही अधिकारी होते. ज्यावेळी त्या उतरल्या त्यावेळी त्यांच्या दर्जाचा व्यक्ती आला नाही. त्याठिकाणी भारतीय दूतावासला इंदिरा गांधी यांनी विचारल आपलं शेड्युअल काय आहे? त्यांनी देशाच्या प्रमुखांना भेटायला जायचं आहे सांगितलं. त्यावेळी इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या मला तुमच्या घरी यायचं आहे. गुजराल नावाचे भारतीय दूतावास होते त्यांच्या घरी त्या गेल्या. इंदिरा गांधी यांनी घरी गेल्यावर लहान मुलांना बोलवायला लावल आणि त्यांच्यासोबत खेळू लागल्या. रशियाचे अध्यक्ष भेटायला थांबले होते. परंतु इंदिरा गांधी यांनी जाण पसंद केल नाही. त्यांनी सांगितल मी इथे आले त्यावेळी यांच्या देशाच्या प्रमुखांनी येणे अपेक्षित होते. परंतु ते आले नाहीत. मी इथे इंदिरा गांधी म्हणून नाही तर 40 कोटी जनतेची प्रतिनिधी म्हणून आले आहे.

आता नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकते का ?

महाराष्ट्र च्या मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हे अजिबात आम्हाला मंजूर नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. एक गृहस्थ जवाहरलाल नेहरू बाबत बोलले. सध्या नेहरू आणि मोदी अशी अशी स्पर्धा लावली जात आहे. आता नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकते का? अनेक वर्ष प्रधानमंत्री होते. इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम नेहरू यांनी केलं ते आपण विसरू शकत नाही. नेहरू हे नेहरू होते त्यांच्यासोबत तुलना होऊच शकत नाही, अशा शब्दात त्यांनी तुलना करणाऱ्यांना फटकारलं आहे .