शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
खान्देश आणि मराठवाड्याला जोडणारा शेंदुर्णी ते सोयगाव रस्ता समस्येचे माहेरघर ठरत आहे.रस्त्याने दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपे यामुळे वाहनधारकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे.दोन ठिकाणी अवघड वळणावरच रस्त्याच्या बाजुला ही झुडपे वाढल्याने समोरचं वाहन दिसत नाही यामुळे अनेक अपघात झाले असुन अनेक निरपराधांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
शेंदुर्णी येथील पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याचे काम झाले मात्र ४० ते ५० फुट रस्ता तसाच पडुन राहिला आहे.याचा वाहनधारकांना पायी घालणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.पावसाळ्यात या ठिकाणी तीन चार फुट पाणी साचते यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते.वाहने दोन्ही बाजुला उभी करावी लागतात.पाण्याचा योग्य निचरा न केल्याने दरवर्षी ही समस्या निर्माण होत आहे.
तरी या दोन्ही समस्या विचारात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर व सार्वजनिक बांधकाम विभाग सोयगाव यांच्या मुख्य अभियंता यांना शेंदुर्णी येथील माजी नगरसेवक ॲड.धर्मराज सुर्यवंशी यांनी रितसर नोटीस पाठवली असुन ही समस्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे.
Home आपलं जळगाव शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यावर काटेरी झुडपाचा तसेच अर्धवट रस्त्यामुळे अपघाताचा वाढत आहे...



