पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर , दिल्लीत घडामोडींना वेग, मोदींच्या कॅबिनेटमध्ये बदलाचे संकेत .

दिल्ली – राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तशा हालचाली सध्या दिल्लीत सुरू आहेत. मोदी सरकारचा खास प्लॅन आहे. त्यात अनेक कॅबिनेट मंत्र्यांना झटका बसू शकतो. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे हे मोठे आव्हान आज केंद्र सरकारपुढे उभे आहे. अर्थव्यवस्थेवरील ताण वाढला. कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत, ज्यामुळे थेट परिणाम देशात होत आहे. अशातच आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात काही मोठे बदल होऊ शकतात. भारतीय जनता पार्टीने चार राज्यांच्या नव्या प्रदेशाध्यक्ष नियुक्तीनंतर सरकारमध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. भाजपाने हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि त्रिपुराच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. दोन केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना 18 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकरिता पुन्हा संधी दिली नाही. बिट्टू पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देतील, त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. राज्यसभेचा त्यांचा कार्यकाळ संपला आहे.
एजन्सीच्या रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आपल्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करू शकतात. राज्यसभेच्या एकूण 24 जागांकरिता 18 जून रोजी मतदान होईल.10 जागांवर भाजपाची जिंकेल असा विश्वास आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपाकडून सुरू आहे. धर्मांतर, अंमली पदार्थ आणि पंजाबची थांबलेली प्रगती या मुद्द्यांवर ही निवडणूक सामोरे जाईल. त्यापूर्वीच मंत्रिमंडळात बदल्याचे थेट संकेत देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. आता या फेरबदलमध्ये कोणाचे पद जाते, यावरही जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, याकरिता सरकार प्रयत्न करत आहे. शिवाय पुढे पंजाबच्या निवडणुकाही आहेत. पंजाबच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होऊ शकतात, तसे संकेत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.