जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे नंदकिशोर महाजन सर्वाधिक मतांनी विजयी

या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी  एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये तायडे शरद शामराव यांना १७ मते, अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते तर रेश्मा कुंदन काळे यांना १ मत मिळाले. याशिवाय ५ मते अवैध ठरली. मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक १ वर श्री. महाजन यांना २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली. मतमोजणीनंतर मा. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विजयी उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, डॉ .राधेश्याम चौधरी, दिपक सुर्यवंशी ,पितांबर भावसार तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.