शेंदुर्णी ताजामनेर प्रतिनिधी –
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरात व्यापारी मोठी बाजारपेठ आहे.शैक्षणिक,कृषी व आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र म्हणुन ओळखले जाते.शेंदुर्णी व परिसरातील असंख्य नागरिकांचे दैनंदिन प्रशासकीय कामे,व्यवहार शेंदुर्णीशी निगडित असुन महसुलच्या विविध कामांसाठी त्यांना जामनेर येथे तहसील कार्यालयात जावे यामुळे जाहीर करण्यात आलेले अप्पर तहसील कार्यालय शेंदुर्णी येथेच व्हावे तसेच अन्य ठिकाणी होऊच नये यावर मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवुन यांचे निवेदन जळगांवचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना शेंदुर्णी नवनिर्माण अप्पर तससील कार्यालय संघर्ष समितीचे वतीने आज देण्यात आले.
यावेळी शेंदुर्णी नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना शेंदुर्णी शहर अप्पर तहसील साठी योग्य आहे हे सांगताना शहराची लोकसंख्या,मतदारांची संख्या, धार्मिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक दृष्ट्या महत्व विषद करुन खान्देश चे प्रति पंढरपुर नगरी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या शेंदुर्णी येथे भगवान श्री त्रिविक्रम मंदिर यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात तसेच भगवान श्री चक्रधर स्वामी यांंचेही भव्य मंदिर असुन महानुभाव पंथाच्या मोठ्या प्रमाणावर सोहळे सुद्धा संपन्न झाले असुन अप्पर तससील कार्यालयासाठी शेंदुर्णी नगरपंचायत भव्य इमारत सुद्धा उपलब्ध करून देण्यास तयार असुन शेंदुर्णी येथे अप्पर तससील कार्यालय व्हावे अशी मागणी करुन अन्य ठिकाणी होऊ नये यासाठी हरकती सुद्धा नोंदवत असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी उपनगराध्यक्ष शरद बारी,माजी सरपंच सागरमल जैन,माजी सरपंच व नगरसेवक शांताराम गुजर, राष्ट्रवादी चे नेते सतिषचंद्र काशिद, भाजपचे नेते अमृत खलसे,सुधाकर बारी, पंडितराव जोहरे, डॉ.किरण सुर्यवंशी, तसेच नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, चेअरमन, विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच व्यापारी, वकिल, पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



