तोंडापूर (जामनेर) : तोंडापूर (जामनेर) येथील प्रा. संजय अनिल अग्रवाल हे मराठवाडा मित्र मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MMIT), लोहगाव, पुणे येथे कार्यरत असून, त्यांना एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, मणिपूर येथून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. अग्रवाल यांनी “मल्टीमोडल डीप लर्निंग अँप्रोच फॉर ऑटोमॅटिक बिनाइन अँड मॅलिग्नंट ब्रेन ट्यूमर डिटेक्शन” या विषयावर संशोधन केले. या संशोधनामध्ये मेंदूतील सौम्य (Benign) आणि घातक (Malignant) ब्रेन ट्यूमरचे स्वयंचलित निदान करण्यासाठी मल्टिमोडल डीप लर्निंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
त्यांच्या संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि ईएमजी सिग्नल प्रोसेसिंग या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला.
तोंडापूर सारख्या ग्रामीण भागातून दहावी पर्यंत शिक्षण घेवून एक उच्च पदवी प्राप्त केली. प्रा. अग्रवाल यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल मराठवाडा मित्र मंडळ, MMITचे पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, सहकारी प्राध्यापक,पालक, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. अग्रवाल यांच्या या उल्लेखनीय यशामुळे तोंडापूर (जामनेर) तसेच MMIT, लोहगाव, पुणे यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात मानाची भर पडली आहे.