पहुर महावितरण मध्ये सोलर योजना सबसिडी चा बोगस कारभार 19 जून रोजी तालाठोको आंदोलनचा इशारा

राहुल सपकाळे शेंदुर्णी- अनुसूचित जाती/जमातीच्या टाळुवरच लोणी इतरांच्या घश्यात ओतणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा व शासनाची फसवणूक करून बोगस लाभ घेणारांकडून संबंधित रक्कम वसुल करा.अन्यथा ही कार्यवाही मुदतीत न झाल्यास दि. १९/६/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता महावितरण पहूर उप विभाग येथे आंदोलन करून कार्यालयाला कुलूप लावले जाईल त्यानंतर भुसावळ विभागीय कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन केले जाईल असा इशारा दिनांक: ८/६/२०२६ रोजी.लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय आदिवासी एकदा परिषद नई दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा अश्विनीताई भाकडे यांनी दिला आहे.

संबंधित प्रकार शेती पंप सोलर योजनेशी जोडला असून sc,st, बनावट उमेदवार दाखवून शासनाची फसवणूक करून शासनाकडून मोठ्या प्रमानात सोलर योजने साठी सबसिडी लाटण्यात आली असल्याचे संबंधित निवेदनात पुराव्यानिशी म्हटले आहे. अश्याच प्रकाराने खऱ्या sc/st लोकांना आपल्या अधिकारा पासून वंचींत राहावे लागत आहे. संबंधित प्रकरणाचा पाठ पुरावा गेल्या चार ते पाच महिन्यापासून करत असल्याचे अश्विनीताई भाकडे यांचे म्हणणे आहे मात्र या अगोदर निवेदन देऊन सुद्धा कार्यवाही न झाल्याने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली असेही त्यांचे म्हणणे आहे.

तसेंच संबंधित प्रकारात sc/st.समाजाला न्याय न मिळाल्यास राष्ट्रीय आदिवासी एकदा परिषद नई दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा अश्विनीताई भाकडे यांनी संपूर्ण sc/st समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.